राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला ‘राजा’ माणूस

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :- राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड मारा के नाही?,”

अशा शब्दात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

तसेच राज यांचा उल्लेखही शिंदे यांनी, या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असणारा एकमेव राजा, असा केला आहे.

देशात करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. याअंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरू होणार आहे. या निर्णयानंतर दिग्दर्शक शिंदे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या मान्य झाल्याचा उल्लेख केदार शिंदेंनी ट्विटमध्ये केला. आहे.

काही दिवसांपूर्वीच लसींची संख्या वाढवण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती,

जी पंतप्रधानांनी मान्य केली असे ट्विट राज ठाकरे यांनी केलं होतं. यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी असून केंद्र सरकार या महामारीवर मात करण्यासाठी कायमच सहाय्य करेल, अशी आशाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|