गव्हाच्या दरात मोठी वाढ; गहू उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- युक्रेन या दोन देशातील युद्धामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. या युद्धाचा परिणाम गव्हाच्या दरात मध्ये देखील झाल्याचे दिसत आहे.

गेल्या पंधरा दिवसात अहमदनगरच्या बाजार गव्हाचे भाव 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली असून. गहू उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र सर्वसामान्य कुटुंबाला त्याची झळ बसणार आहे.

गव्हा बरोबर खाद्य पदार्थ व अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश असून .

भारतात देखील रशियातून मोठ्या प्रमाणावर गहू आयात करून बाजार भाव समतोल राखला जातो. असे असले तरी, रशिया युक्रेन युद्धामुळे गव्हाची आवक देखील बंद झाली आहे. त्याचा परिणाम गेल्या पंधरा दिवसापूर्वी नगरच्या बाजारात गव्हाला 1900 रुपये प्रति क्विंटल दर होता.

तर तो आज 2200 ते 2400 रुपये क्विंटल दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. भारतातील मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही भागातील अवकाळी पावसाने गव्हाची नासाडी झाली असल्यामुळे.

गव्हाची आवक देखील घटली आहे. तर त्याचा परिणाम आणखी गहू दरवाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe