राजकारणात अपयशी ठरलेला माणूस फायद्यासाठी संघर्ष उभा करतोय !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- राजकारणात अपयशी ठरलेला माणूस फायद्यासाठी संघर्ष उभा करतोय, अशी खरमरीत टीका संभाजी ब्रिगेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचं वक्तव्य केलं होतं. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोपच राज ठाकरे यांनी केला.

या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्य प्रविण गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट करत राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.

राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe