अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- लग्नाच्या बोलणी दरम्यान ठरलेल्या हुंड्यापेक्षा अधिक हुंडा मागणाऱ्या वराकडील मंडळीला जास्त हुंडा देण्यास नकार दिल्याने लग्न मोडल्याचे सांगून फसवणूक करत मुलीस त्रास दिल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले येथे महालक्ष्मी रोड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुण विद्यार्थिनीशी श्रीरामपूर येथील सप्तक गजानन मुंडलिक,याचे गजानन मुंडलिक, रेणुका मुंडलिक,
साक्षी मुंडलिक तर पाथर्डी येथील सिद्धी शहाणे, बाळासाहेब शहाणे यांनी लग्न जमवले होते. दरम्यान संबंधितांनी आतापर्यंत वेळोवेळी ८ तोळे सोने वेगवेगळ्या स्वरुपात दिले होते. मात्र वराकडील मंडळीनी अधिक हंड्याची मागणी केली.
त्यामुळे अधिक हुंडा न देण्याबाबत त्या तरुणीने कळविले असता पुंडलिक व शहाणे याने सदर लग्न जमलेल्या तरुणीची फसवणूक करुन लग्न मोडून टाकले व सप्तक गजानन मुंडलिक याने माझे दसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहे
असे म्हणून नेहमी शिवीगाळ व दमदाटी करुन लग्न मोडल्यानंतर तरुणीला प्री वेडिंगशुट माझ्याकडे असूत त्याआधारे तुझे दुसरे लग्न जमू देणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणीने अकोले पोलिसात दिलेल्या
फिर्यादीवरुन सप्तक गजानन मुंडलिक, गजानन चांगदेव मुंडलिक, रेणुका गजानन मुंडलिक, साक्षी गजानन मुंडलिक (सर्व रा.बेलापूर रोड,श्रीरामपूर), सिद्धी राज शहाणे, बाळासाहेब भास्कर शहाणे (दोघे रा.पाथर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम