दोन बिबट्यांची जुंपली झुंज; या तालुक्यातील थरारक प्रकार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील एकरुखे येथे एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला असल्याची माहिती समोर येते आहे.

दरम्यान मृत बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती याबाबत अधिक माहिती अशी कि, एकरूखे गावातील अस्तगाव रोडवरील शेतकरी सुधाकर जगन्नाथ सातव यांच्या शेतात काल दि. 25 रोजी नेहमीप्रमाणे रोहिणी सातव या गेल्या असता

त्यांना एक बिबट्या जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत दिसला. बिबट्याची कुठल्याही प्रकारची हालचाल जाणवत नव्हती. त्यामुळे अधिक जवळ जाऊन पाहिले असता हा बिबट्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

त्यांनी ही वार्ता घरच्या लोकांना सांगितली. तातडीने वनविभागाचे अधिकारी सुरासे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. प्रथमदर्शनी वनविभागाचे अधिकारी गोरक्ष सुरासे यांनी पाहणी करत दोन नर जातीच्या बिबट्यांमध्ये झुंज होऊन

यातील एकाला आपला प्राण गमवावा लागला असल्याचा दुजोरा दिला आहे. गावात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याचे वृत परिसरात पसरताच बघ्यांची गर्दी होत होती. वनाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

दोन नर जातीच्या बिबट्यांची झुंज होऊन यात एकाला आपला प्राण गमवावा लागला असून हा नर चार वर्षाचा असून त्याच्या पोटावर, चेहर्‍यावर अनेक जखमा होत्या. एक डोळा निकामी झाला होता.

एका ठिकाणी दोन नर राहत नाही. त्यातून ही झुंज झाली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe