अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-देशात कोरोनाचा हाहाकार झाला आहे. यातच कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी सर्वत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.
मात्र सध्या देशासह राज्यात एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके…. राज्यातील नेतेमंडळींकडून लंकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकतेच लंकेना दादांनी म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून विचारपूस केली.

हॅलो, मी अजित पवार बोलतोय, निलेश कसा आहेस…अरे बाबा तू स्वत:ची काळजी घे. रुग्णांची सेवा करतोय हे वाचून,व्हिडीओ पाहून आनंद वाटला. पण स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नको, काळजी घेत जा, आणि काही लागलं तर फोन कर असा मोलाचा सल्ला अजितदादांनी आमदार निलेश लंकेंना दिला आहे.
अलीकडेच निलेश लंके यांचे व्हिडीओ, बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. कोरोना सेंटरमध्येच आमदार निलेश लंके जेवण करतात. तिथेच मुक्काम करतात. सगळ्या लोकांची आपुलकीने काळजी घेतात.
निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील केले आहे. निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कोरोनाग्रस्तांसाठी ११०० बेड्स उपलब्ध करून दिले आहेत.
लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळत आहे. आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. इतकेच नाही तर काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत.
केवळ परदेशातून १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे. भाळवणीच्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|