अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-एका लाचखोर पोलीस हवालदारास दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन ही कारवाई केली.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात असलेले संजय काळे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे नातवावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व चार्जशिटसाठी संजय काळे यांनी तक्रारदाराकडे 2000 रपयांची लाचेची मागणी केली होती.
ही रक्कम स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील यांच्या समवेत पोलीसा नाईक प्रकाश महाजन, एकनाथ बाविस्कर, पळशीकर यांनी हा सापळा यशस्वीपणे पार पाडला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम