अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- केवायसी अपडेटचे आमिष दाखवून बीएसएनएल कंपनीतील निवृत्त टेलिकॉम टेक्निकल असिस्टंटला एका भामट्याने सव्वा लाखास गंडवले.
रमेश रामराव देशमुख असे फसवणूक झालेल्या निवृत्त असिस्टंटचे नाव आहे. देशमुख हे बीएसएनएल कंपनीत टेलीकॉम टेक्नीकल असिस्टंट म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे एसबीआय बँकेत पेन्शन खाते आहे.

१५ जून रोजी रात्री आठ ते नऊ यावेळेत देशमुख यांच्या मोबाइलवर भामट्याने संपर्क साधून आपण ‘बीएसएनएल कस्टमर केअर सेंटरमधुन अधिकारी बोलतोय, तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे.’
त्यासाठी तुमचे बँकेचे डिटेल्स द्या असे सांगितले़ तसेच मोबाईलवर प्ले स्टोअरमध्ये जावून अक्सेस नावाचे एक अप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगितले़ देशमूख यांनी अप्लीकेशन डाऊनलोड केले़ त्यानंतर भामटयाच्या सांगण्यानुसार एक्सेसवर दहा रुपये पाठवले.
त्यानंतर लगेच पैसे कपात झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर देशमुख यांनी बँक खाते तपासले असता एन-४ येथील एसबीआय बँकेच्या खात्यातून तीन टप्प्यात ५० हजार रुपये कपात झाल्याचे दिसून आले.
तसेच रामदास टावर येथील एसबीआयच्या खात्यातून आठ टप्प्यात ५१ हजार १७६ रुपये भामटयाने लांबवले़ तसेच
बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून देखील १९ हजार ८५२ रुपये काढून घेतले शिवाय २३ हजार ४०१ रुपए देशमुख यांच्याच एसबीआयच्या खात्यावर ट्रासफर करून त्यातून काढून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देशमुख यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम