बेपत्ता व्यापार्याची माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस मिळणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरणा संदर्भात अचुक माहिती देणाऱ्यास बेलापुरातील व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले.

घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक ६ मार्च रोजी शाळा, महाविद्यालय व अत्यावश्यक सेवेसह १०० टक्के गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बेलापुरातील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण होऊन तीन दिवस उलटूनही यांचा तपास न लागल्याने भाजपाच्यावतीने अतिरिक्त पोलिस अधिक्षिका दिपाली काळे यांना निवेदन देण्यात आले.

लवकरात लवकर तपास न लागल्यास शहर बंद पुकारण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, व्यापारी हिरण बेपत्ता होऊन तीन दिवस उलटले. अद्याप त्यांचा कुठलाही तपास पोलिसांकडून होताना दिसत नाही.

सदर घटनेमुळे तालुक्यातील सर्व व्यापारी व जनतेत भितीचे वातावरण पसरले आहे. असा अनुचित प्रकार कोणत्याही व्यपाऱ्यासोबत होऊ नये, यासाठी पोलिसांनी कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.

ठलाही तपास पोलिसांकडून होताना दिसत नाही. :- सदर घटनेमुळे तालुक्यातील सर्व व्यापारी व जनतेत भितीचे वातावरण पसरले आहे. असा अनुचित प्रकार कोणत्याही व्यपाऱ्यासोबत होऊ नये, यासाठी पोलिसांनी कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.

माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस बेलापुरातील व्यापारी गौतम हिरण हे तीन दिवसासांसून बेपत्ता आहेत. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी गुन्हा घडून बराच कालावधी लोटल्यामुळे गौतम हिरण यांच्या विषयी कुटुंबासह व्यापारी व ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.

त्यामुळे पुढील आंदोलनांची दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी बेलापूर ग्रामस्थांची बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी हिरण परिवार व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने अचूक माहिती देणारास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News