राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत घसघशीत वाढ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

यापुढे स्थानिक विकास निधीअंतर्गत प्रतिवर्षी ३ कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी सन २०११-१२ पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदारास २ कोटी विकास निधी प्राप्त होत होता.

विधान परिषदेचे ७८ आणि विधानसभेचे २८८ आमदार राज्य विधिमंडळात आहेत. अलीकडच्या काळात बांधकाम साहित्यात मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे विकास निधीत वाढ करण्याची मागणी आमदार सातत्याने करत होते. वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात आमदार निधीत एक कोटी वाढ करण्याची घोषणा झाली होती.

मात्र तो वाढीव निधी प्राप्त झाला नव्हता. मंगळवारी नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

वाढीव निधीचा शासनाच्या तिजोरीवर ३६६ कोटींचा बोजा पडणार आहे. स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत लहान कामे केली जातात.

विकास निधीत एक कोटीची घसघशीत वाढ केल्याने आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अधिक संख्येने कामे करणे यापुढे शक्य होणार आहे. तसेच जुन्या योजनांच्या दुरुस्तीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News