अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- पाकिस्तानमधील ग्वादर येथे असलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांच्या पुतळा एका बॉम्ब हल्ल्याने उडविण्यात आला आहे. बलुचिस्तान प्रांतातील किनारपट्टीच्या भागात असणाऱ्या ग्वादर शहरात हा हल्ला करण्यात आला.
पर्यटकांच्या वेशात बलुच विद्रोही इथं आले, आणि पुतळ्याखाली स्फोटकं ठेवल्याची माहिती आहे. या स्फोटात पुतळा पूर्णपणे नष्ट झाला आहे. प्रतिबंधित अतिरेकी संघटना बलुच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ते बाबगार बलूच यांनी ट्विटरवर स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती दिली आहे.
ग्वादर उपायुक्त मेजर (सेवानिवृत्त) अब्दुल कबीर खान यांच्या माहितीनुसार, या घटनेची उच्चस्तरावर तपासणी केली जाईल.
ते म्हणाले की, ‘पर्यटकाच्या रुपात या श्रेत्रात घुसून जिन्ना यांच्या पुतळ्याच्या खाली बॉम्ब ठेवण्यात आला होता. याप्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही आहे.
परंतु काहींची चौकशी सुरू आहे. याप्रकरणाची चारही बाजूंनी चौकशी केली जात असून लवकरच दोषींना अटक केली जाईल.
दरम्यान १९१३ पासून १४ ऑगस्ट १९४७, पाकिस्तानच्या स्थापनेपर्यंत ऑल इंडिया मुस्लिम लीगचे जिन्ना नेता होते. त्यानंतर १९४८ साली त्यांचे निधन झाले. जिन्ना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल राहिले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम