महामार्गावर रस्तालूट करणाऱ्या सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-  नगर-मनमाड महामार्गावर रविवारी रस्तालूट करणाऱ्या सात-आठ सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला. राहुरी ठाण्यातील ३५ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नांदगाव ते कोल्हार दरम्यानचा परिसर पिंजून काढला.

मात्र त्यांना चाेरटे सापडले नाहीत. रविवारी रात्री सव्वादहा वाजता नगर-मनमाड महामार्गावर दुचाकीस्वार अशोक गायकवाड (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांना दुचाकीवरील तीन चोरट्यांनी अडवले.

एकाने गायकवाड यांच्या गळ्याला सत्तूर लावला, तर दोघांनी त्यांच्या शर्ट व पँटच्या खिशातून रोख दहा हजार रुपये व मोबाइल लंपास केला. गुहा पाट येथील काही भाविक पिक-अप वाहनातून पंढरपूरहून घरी परतत होते. त्यांचे वाहन गुहा पाटावर आले असता, दोन दुचाकींवरील पाच चोरट्यांनी अडवले.

मात्र, शेजारचे नागरिक मदतीला धावल्याने चोरटे पळून गेले. दरम्यान, निरीक्षक नंदकुमार दुधाळ, सहायक निरीक्षक शंकरसिंह रजपूत, उपनिरीक्षक नीरज बोकील, उपनिरीक्षक तुषार धाकराव, उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ यांची पथके महामार्गावर उतरली.

गुहा पाट ते गुहादरम्यान उपनिरीक्षक धाकराव यांच्या पथकाने दुचाकीवरील चोरट्यांचा पाठलाग केला. गुहाहून तांभेरेकडे वळालेल्या चोरांच्या दुचाकीला पोलिसांच्या वाहनाने धक्का देऊन पाडले. वाहनातून पोलिस खाली उतरेपर्यंत चोरट्यांनी अंधारात धूम ठोकली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News