वाढदिवस असलेल्या प्रत्येकाने लावले एक झाड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे 1 जून रोजी वाढदिवस असलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन वृक्षरोपण अभियान राबविले. वाढदिवस असलेल्या प्रत्येकाने एक झाड लाऊन त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली.

गावातील सार्वजनिक व्यायाम शाळा परिसरात ही पर्यावरणपुरक झाडे लावण्यात आली. स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी दूध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, किरण जाधव, अण्णा जाधव, उद्योजक दिलावर शेख, भागचंद जाधव, बाबूराव जाधव, भाऊसाहेब ठाणगे, बाळू भापकर,

लक्ष्मण चौरे, अशोक कापसे, गोरख चौरे, डॉ.विजय जाधव, अंबादास जाधव, अतुल फलके, शिरीष फलके आदी उपस्थित होते. पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना सर्वांनी राबवावी.

प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय राहिला नाही. आपला वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करण्याचे त्यांनी आवाहन केले.

चेअरमन गोकुळ जाधव यांनी मानवाने निसर्गावर अतिक्रमण करुन त्याचे समतोल बिघडवले आहे. हल्ली ऋतू देखील बदलले असून, याला मनुष्य जबाबदार आहे. जंगलाची कत्तल करण्यात आल्याने जंगली प्राणी मनुष्य वस्तीत आढळत आहे.

प्रत्येकाने निसर्गाचे समतोल साधण्यासाठी एक तरी झाड लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे गावाचे सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड व वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी कौतुक केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe