अबब ! नगर अर्बन बँकेचा कोटींचा झोल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- गेल्या काही दिवसांपासून नगर अर्बन बँक ही आपल्या वेगवेगळ्या गफल्यांमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

या बँकांविषयी दरदिवशी काहीतरी वेगळे प्रकरण बाहेर येऊ लागले आहे. नुकतेच आता आणखी एक कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.

यामुळे बँकेची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. अर्बन बॅंकेच्या येथील मुख्य कार्यालयातून बाजार समिती शाखेत अडीच कोटी रुपये जमा केल्याचे “रेकॉर्ड’ तयार केले.

मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम तिकडे भरली गेलीच नाही. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी अर्बन बॅंकेतील, नाण्यांचा अडीच कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आणला.

बॅंकेच्या मुख्य कार्यालयाने २०१७ मध्ये ही रक्कम बाजार समितीमधील शाखेकडे पाठविल्याचे “रेकॉर्ड’ तयार केले. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम बाजार समिती शाखेला मिळालीच नाही.

कर्जदार आशुतोष लांडगे याच्याकडे बॅंकेचे सहा कोटींचे कर्ज थकीत असताना, पुन्हा त्याला तीन कोटींचे कर्ज दिल्याचेही “रेकॉर्ड’ तयार केले. याबाबत राजेंद्र गांधी यांनी २०१९ मध्ये पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली.

पोलिसांनी बॅंकेकडे चौकशी केली असता, त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या. संबंधित रक्कम बाजार समिती शाखेला मिळालीच नाही. थकीत कर्जदार लांडगे याला नवीन कर्ज मंजूर करण्यापूर्वीच ही रक्कम दिली गेली.

याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात २२ डिसेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. लांडगे यास चिंचवड (जि. पुणे) येथील बनावट कर्जप्रकरणी अटक केल्यानंतर नगरच्या पोलिसांनी नाण्यांबाबतच्या गुन्ह्याची चौकशी सुरू केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe