बोगस कर्जप्रकरणातील आरोपी डॉ. निलेश शेळके विरोधात दोषारोपपत्र दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- शहर सहकारी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. निलेश शेळके विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यांचे स्वतंत्र दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली.

अहमदनगर शहर सहकारी बँकेने हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदी करण्यासाठी17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते.

राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे, नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे या तिघांनी फिर्याद नोंदवली असून, बनावट कागदपत्रांद्वारे या तिघांची प्रत्येकी 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला शोधण्यासाठी पुणे येथे गेलेल्या पोलिसांच्या पथकाला डॉ. शेळके हाती लागला होता. त्या गुन्ह्यात त्याची चौकशी केल्यानंतर त्याला शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe