अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-अहमदनगर मधील प्रसिद्ध उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख व निहाल शेख यांना जन्मठेपची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांचे कोठला परिसरातून अपहरण झाले होते. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात भादवि कलम363,364(अ),34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अहमदनगर पोलिसांनी अपहरणकर्त्यांची माहिती काढून अपहरण झाल्यानंतर काही तासातच हुंडेकरी यांची सुखरूप सुटका करून आरोपी अजहर मंजुर शेख, निहाल /बाबा मुशरफ शेख यांना अटक केले होते.
सदर गुन्ह्याचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पिंगळे यांनी तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणात ॲड.पवार ए.बी. यांनी सरकारी पक्षाची बाजु मांडली.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री अशोक कुमार भिलारे यांनी आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|