८० वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगरजवळील रतडगाव येथे शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८० वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

नाना चंदु निकम (वय २१ रा. रतडगाव, नगर) असे त्या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याला दहा वर्षे सक्त मजुरी व २८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

जिल्हा न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी या आरोपीला शिक्षा दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील रतडगावगावात ८ मार्च २०२० रोजी ही घटना घडली होती.

पीडित वृद्ध महिला शेतात एकटी असताना आरोपीने गलुलीने तिच्या तोंडावर दगड मारून मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तत्कालीन उपनिरीक्षक धनराज जारवाल यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.न्यायालयासमोर आलेले साक्षी,

पुरावे व सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी पंधरा हजार रुपये फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या खटल्यात ॲड. दिवाणे यांना हेडकॉस्टेबल पोपट रोकडे यांनी सहकार्य केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe