अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती.
मे २०१९ मध्ये तिच्याशी जबरदस्तीने लग्न करुन अत्याचार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नवनाथ श्रावण शाख याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बबन कुंढारे यांनी आरोपी नवनाथ श्रावण शाख (वय २३ रा.डाऊच बु) विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादीत म्हंटले आहे कि,
2018- 19 पासून आज पर्यंत आरोपी नवनाथ श्रावण शाख याने आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले.
आरोपीने तिच्याशी बळजबरीने 23 मे 2019 रोजी लग्न करुन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवल्याने ती आठ महिन्याची गरोदर राहिली.
यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई.भरत नागरे पुढील तपास करीत आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved