पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नाशिकमधून अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- राहुरीत दारूअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणार्‍या एका आरोपीस नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून अटक करण्यात आली आहे. जगन्नाथ गुलाब जाधव (वय 36, रा. पिंप्री वळण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीला न्यायालयात हजार करण्यात आले असता त्याला राहुरी न्यायालयाने तीन जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या हल्ला प्रकरणातील अशोक पवार (रा. पिंप्री वळण) व किरण गोलवड (रा. वळण) हे दोन आरोपी अद्याप पसार आहेत.

तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील वळण येथे दारूअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी दि.5 मे रोजी पोलीस कॉन्स्टेबल दीपक फुंदे, सचिन ताजने, सुशांत दिवटे हे पोलीस कर्मचारी गेले होते.

त्यांच्यावर या तिन्ही आरोपींनी दगडफेक केली होती. त्यातील मुख्य आरोपी जगन्नाथ जाधव याला पोलीस पथकाने सिन्नर तालुक्यात औद्योगिक वसाहतीतून ताब्यात घेतले. उर्वरित दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News