अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- एकावर प्राणघातक हल्ला करुन खुनाचा प्रयत्न करणार्या अडीच वर्षापासून पसार आरोपीस पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे आठवाडी येथील नासीर सलीम शेख याच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करणारा पसार झालेल्या सद्दाम उर्फ बबली राजू शेख (रा. रामगड,श्रीरामपूर) यास पोलिसांनी सापळा रचून त्यास जेरबंद केले.
तसेच दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर शहरातील बसस्थानकावर ज्योतील साबदे या महिलेची पर्स चोरणार्या जाफर करीम शेख या आरोपीस या पोलीस पथकाने सापळा लावून अटक केली.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरवडे,
पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी, पोलीस नाईक दुधाडे, पोलीस कॉन्स्टेबल दिघे, पंकज गोसावी, राहुल नरोडे, संतोष बडे, महेद्र पवार, किशोर जाधव यांनी सदरची कारवाई केली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|