वृध्द महिलेच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी तीन वर्षांनी गजाआड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी डुग्या ऊर्फ सुनील रघुनाथ शिंदे (वय 29) गेल्या तीन वर्षांपासून फरार होता.

त्याला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

शहरातील लाल टाकी येथील भारस्कर कॉलनीत माया वसंत शिरसाठ (वय 35) व शेजारील सारिका संतोष भारस्कर यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून 10 एप्रिल 2019 रोजी भांडणे झाली होती.

आरोपी सारिका भारस्कर आणि त्यांचे नातेवाईक नितीन दिनकर, विक्रम दिनकर, मुकेश दिनकर, करण दिनकर यांच्यासह इतर 14 ते 15 आरोपींनी माया शिरसाठ व त्यांच्या सासू बेबी अर्जुन शिरसाठ, दीर सचिन शिरसाठ, विनोद शिरसाठ,

संतोष शिरसाठ व नातेवाइकांना लाकडी दांडके, चाकू, तलवारीने मारहाण केली होती. यात बेबी शिरसाठ यांचा मृत्यू झाला.

यातील आरोपी डुग्या ऊर्फ सुनील शिंदे (रा. सिद्धार्थनगर, नगर) हा गेल्या तीन वर्षांपासून फरार होता.

सदर गुन्ह्यातील फरार आरोपी सुनिल ऊर्फ डुग्या शिंदे हा सिध्दार्थनगर परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी

सिध्दार्थनगर येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती काढून आरोपी नामे सुनिल ऊर्फ डुग्या रघूनाथ शिंदे, वय- २९ वर्षे, रा. सिध्दार्थनगर,

अहमदनगर यास ताब्यात घेवून तोफखाना पो.स्टे. येथे हजर केले आहे. पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे. करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe