अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल आईला ठार मारल्याच्या गुन्हेत दोन वर्षापासून राहुरीच्या जेलची हवा खात असलेला आरोपी राजेंद्र गोविंद लांडे याचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे.
आरोपी राजेंद्र लांडे यास रात्री दोन वाजे दरम्यान पोटात त्रास जाणवू लागल्याने त्याला राहुरी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असते तो उपचारापुर्वी मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.
सदर आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असल्याचे सुत्राकडून समजले. या घटनेमुळे रात्रभर पोलिस व महसुल प्रशासनात चांगलीच पळपळ झाली होती. दोन वर्षापुर्वी तांभेरे राजेद्र लांडे याने एकादशीच्या दिवशी माळकरी आईला मटण बनवण्यासाठी हट्ट धरला होता.मात्र एकदशी असुन मी माळकरी आहे.
मी बनवणार नाही असे म्हणल्याचा राग राजेंद्र याने येवून आईच्या डोक्यात जबर मारहाण करुन खुन केला होता. राहुरी पोलिस ठाण्यात मयताचा दुसरा मुलगा दिगंबर लांडे यांनी ३०२ प्रमाणे खुनाची फिर्याद दिली होती.
आरोपी हा गेली महिन्याभरापासुन आजारी होता.त्यास दोन आठवडेभरापूर्वी पुणे येथिल ससुन रुग्णालयात उपचार कामी दाखल केले होते. यानंतर पुन्हा राहुरी येथे आणण्यात आले असता त्यास रात्री त्रास जाणवू लागला असता राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता ,वैद्यकीय अधिकारी प्रताप साळवे यांनी त्यास मयत घोषित केले.
घटनेची माहिती कळताच तहसिलदार फसियोद्दिन शेख,प्रांत अधिकारी दयानंद जगताप,पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ,नायब तहसिलदार गणेश तळेकर,राहुरीच्या न्यायधिश सुजाता शिंदे,
पोलिस उपनिरिक्षक मधुकर शिंदे,निलेशकुमार वाघ,अदिनाथ पाखरे,अमित राठोड,सचिन ताजणे आदि घटनेच्या ठिकाणी दाखल झाले होते. मयत राजेंद्र लांडे याचे शवच्छेदनासाठी नगर येथे पाठवण्यात येणार असल्याचे समजले लांडे यास नेमक्या कोणत्या आजाराची बाधा होती याचे गुढ शवविच्छेदनानंतर समोर येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम