गुटका विक्रेत्यावर कारवाई : पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त !  

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अहमदनगर पोलीसांनी मागील आठवड्यात धडकेबाज कारवाई करत अनेक अट्टल गुन्हेगार जेरबंद केले. आता नगर पाठोपाठ पुणे पोलिस देखील फिल्डवर उतरले असून, त्यांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट कारवाई करत मोठा साठा ताब्यात घेतला आहे. 

या कारवाईत तब्बल ५  लाख १८  हजार रुपयांचा गुटखा आणि साडे तीन लाखाचा टेम्पो असा एकूण पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल चाकण पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, चाकणमधील नाणेकरवाडी येथे एका पान टपरीवर कारवाई करुन पोलिसांनी  ८ हजार ८५०  रुपयांचा गुटखा जप्त करून गुटखा विक्रेता नीरज बन्सल याला ताब्यात घेऊन गुटख्याचा मुख्य पुरवठादार कोण आहे याबाबत चौकशी केली होती.

तेव्हा त्याने अंकुर गुप्ता यांच्याकडून गुटखा आणल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी   शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथून मोकळ्या जागेतून गुप्ता याचा तीन चाकी टेम्पोसह गुटखा जप्त केला आहे.

मात्र मुख्य आरोपी अंकुर गुप्ता पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या या कारवाईचा पुण्यासह नगर जिल्ह्यातील अनेक गुटखा विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe