मनपाच्या भरारी पथकाकडून शंभरहून अधिक विक्रेत्यांवर कारवाई

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच भाग म्हणून शहरातील भाजी बाजार बंद करण्यात आले आहेत.

तसा आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. मात्र या नियमन डावलून भाजी विक्रेते आपला व्यवसाय करत आहे. अशा व्यावसायिकांवर मनपाच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे.

कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील भाजी बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र तरी शहरातील विविध ठिकाणी भाजी विक्रेते पथारी टाकून बसत आहेत. नियमांचे पालन न करता भाजी विक्रेते सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेत बसतात.

शहरातील महात्मा फुले चौक, चितळे रोड, बालिकाश्रम रोड, भुतकरवाडी चौक, एकविरा चौक, पाईपलाईन रोड आदी भागांत भाजी विक्रेते बसतात. भाजी घेण्यासाठी ग्राहकांचीही गर्दी होत असून, यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

महापालिकेने गर्दी रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केली असून, हे पथक सकाळी व सायंकाळी शहरभर फिरत आहे. या पथकाकडून शंभरहून अधिक विक्रेत्यांवर कारवाई केली गेली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe