विनापरवाना नर्सरींमधून रोपांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- भाजीपाला रोपवाटिकांमध्ये विनापरवाना कलमे व रोपे तयार करून सर्रास विक्री होत असल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात उघड झाला आहे.

या प्रकरणी उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गवांदे यांनी १७ नर्सरी चालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

या रोपवाटिकांना बजावण्यात आल्या नोटिसा यश हायटेक नर्सरी (बाभूळगाव खालसा), त्रिमूर्ती हायटेक नर्सरी (सितपूर), अथर्व हायटेक नर्सरी, सीता नर्सरी (पाटेगाव), श्री समर्थ नर्सरी (भांडेवाडी), कृषीरत्न नर्सरी (बर्गेवाडी),

कल्पतरू हायटेक नर्सरी (बाभूळगाव खालसा), आदर्श हायटेक नर्सरी, माउली नर्सरी, समर्थ हायटेक नर्सरी, नाथकृपा नर्सरी (मिरजगाव), जय शिवशंकर नर्सरी, कृषी अंकुर नर्सरी (चिलवडी), गुरुमाऊली नर्सरी (बेनवडी),

जगदंबा नर्सरी (कुळधरण), प्रगती नर्सरी (वडगाव तनपुरे), विशाल नर्सरी (गुरवपिंपरी). कर्जत तालुक्यात कुकडी, घोड, सीनाचे पाणी मिळू लागले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचा कल फळबागा लागवडीकडे वाढला आहे.

याचा गैरफायदा घेऊन अनेकांनी नर्सरींचा व्यवसाय निवडला. त्यात विनापरवानाही अनेकजण नर्सरी चालवित आहेत.

हा प्रकार लक्षात आल्याने उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गवांदे यांनी तालुक्यातील नर्सरींची तपासणी केली. व ज्यांच्याकडे कृषी विद्यापीठ किंवा शासनाचा परवाना नाही. अशा १७ नर्सरी चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe