नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आईवर कर्तव्यनिष्ठ मुलाने केली कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन आहे. त्यामुळे भाजीची दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश आहे. एका जागी बसून भाजी विकण्यास बंदी आहे.

तरीही पाथर्डी शहरात गर्दी होत असल्याचा तक्रारी आहेत. यामुळे अशा भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये विशेषबाब म्हणजे एका कर्तव्यनिष्ठ मुलाने चक्क कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणारी आपल्या आईवर कारवाई करून आपल्या जबाबदारीचे भान बाळगलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोरोनाच्या नियमांतर्गत एकाजागेवर बसून भाजीपाला विक्रीस बंदीचे आदेश देण्यात आले असतानाही काही विक्रेते भाजीपाला विकत असल्याच्या तक्रारी नागरपरिषदेसमोर आल्या.

यामुळे नगरपरिषदेचे पथक वाहन घेऊन भाजी विक्रेते बसतात त्या ठिकाणी आले. पथकात रशीद शेख यांचाही समावेश होता. त्यांची आई बेगम रफीक शेख भाजी विक्रेत्या आहेत.

त्याही याच रस्त्यावर भाजी विकत बसल्या होत्या. रशीद शेख यांनी कोणताही विचार न करता आपल्या आईच्या पुढ्यातील भाजीच्या टोपल्या उचलून घेऊन कचरा गाडीत टाकल्या.

आपल्या कर्तव्य कठोर मुलाकडे पाहत राहण्यावाचून आईकडेही पर्याय नव्हता. शेख यांनी आपल्या आईचीच भाजी जप्त केल्याची माहिती शहरात पसरली तेव्हा त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करण्यात आले.

तहसीलदार आणि पालिका अधिकाऱ्यांनीही शेख यांनी कोणताही भेदभाव न करता केलेल्या कारवाईचे कौतुक केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe