बळीराजाची पिळवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- खतांच्या गोण्यांवर छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.

शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व औषधे खरेदीची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कापसे यांनी शहरातील मार्केटयार्ड येथे कृषी सेवा केंद्रांची पाहणी करून दुकानदारांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या.

तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतः दुकानदाराने व खरेदीदाराने मास्क लावावा, विक्री केंद्रात सॅनिटायझर उपलब्ध करून देत त्याचा स्वतः तसेच खरेदीदाराने वापर करावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे,

केंद्रासमोर गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, सुरक्षित अंतर राहण्यासाठी मार्किंग करणे आवश्यक आहे.

वरील बाबींचे पालन होत नसल्यास जिल्ह्यातील निरीक्षकांकडून अचानक भेटी देऊन कारवाई केली जाईल. असा इशारा देखील या भेटी दरम्यान देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe