सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्रीला अटक, पॉर्न फिल्मसाठी करायची असे काही..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका टॉप मॉडेल आणि एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला पोलीस पथकाने अटक केली आहे.

या दोन्ही महिला दोन तासांसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये घेत असतं. ईशा खान असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव असून ती गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.

पोलिसांना एक पथक तयार करून ईशा खानवर पाळत ठेवली. सुरुवातीला बनावट ग्राहक बनून पोलिसांनी तिच्याशी संपर्क केला.त्यानंतर तिने तरुणींचे अनेक फोटो पोलिसांना पाठविले असता त्यामध्ये प्रसिद्ध मॉडेल व प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा समावेश असल्याचे पोलिसांना दिसून आले.

ईशा खान ग्राहकांकडून एका तरुणीसांठी तासाला तब्बल दोन लाख रुपये घेत असल्याचे उघड झाले. त्यामधिल 50 हजार हे तिच्याकडे ठेवत असे तर दीड लाख रुपये तरुणीला देत असे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे हातात काम नसल्याकारणाने आपण या व्यवसायात आले असल्याचे पोलिसांना मॉडेल आणि अभिनेत्रीने सांगितले आहे.

खरं तर, उद्योगपती राज कुंद्रा नंतर पॉर्न चित्रपटांच्या निर्मिती आणि वितरणाशी संबंधित असल्याच्या कारणावरून अटक झाल्यानंतर मनोरंजन उद्योगातील हे पहिले मोठे प्रकरण होते.

त्यामुळे हे प्रकरण उघडकीस येताच मुंबईतील काही प्रभावशाली लोकांमध्ये आणि ईशाच्या ओळखीच्या लोकांमध्ये खळबळ उडाली. मात्र, क्राईम ब्रांचच्या पथकाने मॉडेल आणि अभिनेत्रीची अटक न दाखवता आणि त्याला बचाव म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe