अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतचा बाॅडीगार्ड कुमार हेगडेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार प्रकरणात कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे.
एका मेकअप आर्टिस्टने कुमार हेगडेविरूद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार मुंबईतील डीएन नगर पोलिसात दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या एका टीमने कुमार हेगडेला मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे.
तक्रारदार महिलेने कंगनाच्या बाॅडीगार्डवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून कुमारने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. कुमार आणि तक्रारदार महिलेची गेल्या वर्षी जूनमध्ये एका सिनेमाच्या शुटींगवेळी भेट झाली होती.
त्यानंतर त्यांची ओळख वाढली. कुमारने तिला लग्नाची विचारणा केली. लग्न करण्याचे आमिष दाखवून लिव्ह-इन मध्ये राहण्यास सांगितले.
एकत्र राहत असताना कुमार हेगडेने महिलेसोबत शरिरसंबंध ठेवले. महिलेने सुरुवातीला विरोध केला मात्र, लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्याने तिला शरिरसंबंध ठेवण्यास बळी पाडले. असे मेकअप आर्टिस्ट महिलेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम