श्रीरामपुरात २४ तासात ७९ रुग्णांची भर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यात काल सलग दुसर्‍या दिवशीही ७९ रुग्ण सापडले आहे. तर ३७२ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

९३ टक्के रुग्ण बरे झाल्याचे दिसून येत आहे. तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असून रविवारी ७९ रुग्णांची भर पडली आहे.

श्रीरामपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागला असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली असून सर्वांनीच सावधान होण्याची वेळ आली.

श्रीरामपूर तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे ६०० च्या घरात पोहचली. रविवारी ७९ रुग्णांची भर पडली.

यामध्ये खासगी प्रयोगशाळा ५४, जिल्हा शल्यचिकित्सक प्रयोगशाळा २, तर अँटीजेन चाचणीत २३ रुग्ण सापडले.

दरम्यान, रविवारी ५२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ३७२ रुग्ण सक्रिय असून सर्व खासगी दवाखाने फुल झाले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe