आदिकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- माजी खासदार गोविंदराव आदिक आज हयात असते, तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल दिसला असता. कारण गोविंदराव आदिक यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देऊनच समाजकारण केले.

त्यांनी नेहमी तळागाळातील शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केले.

अकोल्यात दिवंगत खासदार गोविंदराव आदिक यांच्यावर निस्सीम प्रेम असलेले अनुयायी व भजपचे ज्येष्ठ नेते अॅड. वसंत मनकर यांनी लक्ष्मीनिवास इमारतीतील काॅॅॅॅम्रेड नबादादा मनकर दालनात आयोजित केलेल्या गोविंदराव आदिकांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेत दशरथ सावंत बोलत होते.

यावेळी अॅड. वसंत मनकर, मुक्त पत्रकार शांताराम गजे, अॅड. भाऊसाहेब गोडसे, महेश नवले, शिवाजी नेहे, प्रमोद मंडलिक, प्रकाश नाईकवाडी, बाळासाहेब वडजे, अमोल वैद्य, सचिन शेटे, परशराम शेळके, हितेश कुंभार, अनिल कोळपकर, प्राचार्य सुनील धुमाळ, मच्छिंद्र मंडलिक, बबन तिकांडे,

दत्तात्रय धुमाळ, अॅड. उमेश आवारी, किसन शेळके, सुरेश करवा, आत्माराम काळे उपस्थित होते. अॅड. वसंत मनकर म्हणाले, गोविंदराव आदिक यांच्या जाण्याने देशाचे नुकसान झाले. त्यांच्या चर्चेतून नेहमी शेतकऱ्यांविषयची तळमळच दिसायची.

त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता व कष्ट करण्याची तयारी होती. मात्र तरीही ते सत्तेपासून दूर राहिले अशीही खंत व्यक्त केली. गजे म्हणाले, आदिकांच्या पोटात, ओठात व मनात एकच असायचे. त्यामुळेच त्यांचा स्वभाव फटकळ व स्पष्ट असायचा.

दुर्दैवाने आज कोणी स्पष्ट बोलण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांमधून अनेक संकटे ओढून घेतली आहे. महेश नवले म्हणाले, एक रत्नपारखी व्यक्तिमत्व आता आपल्यात नसल्याचे दुःख आहे. प्रमोद मंडलिक यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe