आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने लसीकरणात गैरप्रकार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-मुंबई महापालिकेकडून लसीकरणात प्रचंड गोंधळ चालू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने हे गैरप्रकार चालू आहेत.

लसीकरणातील गैरप्रकार न थांबल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार करू, असा इशाराही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला.

१८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद झाले असताना कोरोना योद्धे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील बड्या मंडळींचे, अभिनेत्यांचे व अभिनेत्यांशी संबंधित व्यक्तींचे बिनबोभाट लसीकरण चालू आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आ. अतुल शाह , महापालिकेतील भाजपा गटनेते भालचंद्र शिरसाट, विवेकानंद गुप्ता या प्रसंगी उपस्थित होते.

आ. भातखळकर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या वादळामुळे मुंबई महानगरातील झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून

महापालिका व राज्य सरकारने संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी तसेच मुंबईत लसीकरणात चालू असलेले गैरप्रकार थांबवावेत अशा मागण्या भाजपाचे आ. अतुल भातखळकर

यांनी पत्रकार परिषदेत केल्या. भातखळकर म्हणाले की, मुंबईत वादळाने अनेक ठिकाणी झोपड्यांचे पत्रे उडून गेले आहेत.

वादळाने, पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी. या पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले.

साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ते ८ तास लागले. यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होणारे नालेसफाईचे दावे खोटे आहेत हे सिद्ध झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe