शिक्षकांच्या लसीकरणाबाबत प्रशासन उदासीन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- देशभरात आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले आहेत. मात्र करोनाच्या लढाईत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक कर्मचारी उभे राहिले आहेत.

राज्यात करोना योद्धा म्हणून असलेल्या कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली होती. मात्र प्राथमिक शिक्षक अद्यापही लसीकरणापासून वंचित आहे.

राज्यातील प्राथमिक शिक्षक हे शासन आदेशाप्रमाणे सर्वेक्षण करणे. नाकाबंदी च्या ठिकाणी पोलिसांसोबत काम करणे.

स्थानिक पातळीवरील विलगीकरण कक्षात सेवा बजावणे. किराणा पोहचवणे, रेशन दुकानाचा ठिकाणी सेवा बजावणे यासारख्या सेवा वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने बजाविला आहेत.

असे असले तरी शिक्षकांच्या लसीकरणाकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षकांचे लसीकरण करा अशी मागणी शिक्षक संघटनांनी वेळोवेळी निवेदन देऊन प्रशासनाकडे केली आहे.

मात्र शिक्षकांच्या लसीकरण संदर्भात नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर लस उपलब्ध होत नसल्यामुळे आणि शिक्षक कर्मचार्‍यांना प्राधान्याची भूमिका नसल्यामुळे शिक्षकांना लसीकरणात अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे शिक्षकांना प्राधान्य देणे विलास देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेशित करावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळी नियोजन केल्यास तात्काळ लसीकरण होणे शक्य आहे. या संदर्भाने जिल्हा अधिकारी यांनी लक्ष घालून आरोग्य विभागाला आदेशित करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News