अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदवी, पदविका प्राप्त व महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसलेल्या अनधिकृत बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कार्यवाही करुन त्या लॅब बंद करण्यात यावेत याबाबत चे निवेदन अहमदनगर डिस्ट्रिक्ट मेडीकल लॅबोरेटरी टेक्नेशियन असोसिएशन यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना अधिकृत करण्यासाठी महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची स्थापना जुलै २०१७ मध्ये करून तसा कायदा राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीने संमत करून तो लागू केलेला आहे. राज्यात अनेक अप्रशिक्षित मुले मुली स्वतंत्र रित्या वा कॉर्पोरेट पॅथोलॉजिस्ट चे नावा खाली सोशल मिडिया,
जस्ट डायल अशा साईटवर प्रचार करून तसेच अनेक मोठ्या कॉर्पोरेट पॅथोलॉजी लॅबोरटरिज आपली अप्रशिक्षित मुलांचा घरपोहच सेवा, रुग्णांना स्वस्त पॅकेज चे आमिष दाखवून रुग्णांचे रक्त नमुने गोळा करत आहेत. नागरिकांनी सदर लॅब ही कुठे आहे, कशा प्रकारे काम चालते, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद वा महाराष्ट्र परावैद्यकीय परिषद रजिस्टर एम डी वा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजिस्ट द्वारा संचालित आहे का याची शहानिशा करत नसल्याने अशा प्रकारचा गोरख धंदा अहमदनगर जिल्यात सर्वत्र छोट्या मोठ्या शहरातुन होत आहे.
पॅथोलॉजी लॅब वा क्लिनिकल लेबोरेटरी या मध्ये कार्यरत प्रत्येक व्यक्ती मग तो रक्त संकलन करणारा व्यक्ती असला तरि त्यांच्याकडे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदवी, पदविका प्राप्त व महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषदे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जर तो महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषद नोंदणी असलेला असेल तर त्यांचे जवळ तसे प्रमाणपत्र व ओळख पत्र असणे आवश्यक आहे .ज्यावर त्याच्या पॅरावैद्यकीय शैक्षणिक पात्रता व नोंदणी क्रमांक व त्यांचे नाव असते.
परंतु परिषदेकडे नोंदणी न केलेल्या अनधिकृत लॅबोरेटोरीज आपल्या अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आहेत त्या किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत याची माहिती नागरिकांना नसल्यामुळे बरेच नागरिक चुकीचे रिपोर्ट्स किंवा अहवाल घेऊन चुकीच्या उपचाराला बळी पडत आहेत.
तेव्हा अशा संबंधित अनधिकृत लॅबवर कारवाई करून जनतेच्या आरोग्याशी सुरु असलेल्या लुटमारीला आळा घालून त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून अशा लॅबोरेटोरीज बंद कराव्यात असे निवेदन जिल्हाधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी , पोलीस अधिक्षक यांना दिले आहे .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम