कोरोना महामारीच्या लढाईत कोरोना प्रतिबंधात्मक लस हि अत्यंत प्रभावी ठरली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोना लढाईत जिंकण्यासाठी देशभरात वेगाने लसीकरण सुरू आहे.
नुकतेच देशाने लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. दरम्यान आज महाराष्ट्राने १० कोटींचा लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करते सर्वांचे अभिनंदन केले आहे.
१० कोटींचा टप्पा गाठणार महाराष्ट्र देशातील दुसर राज्य आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश राज्याने लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा पार केला होता. राजेश टोपे ट्वीट करून म्हणाले की, ‘महाराष्ट्राने आज १० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला.
प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो.’ आतापर्यंत ६ कोटी ८० लाख २८ हजार १६४ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून
३ कोटी २० लाख ३७ हजार ७३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत १० कोटी ६५ हजार २३७ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली गेली आहे.