अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-ऐक्याची, स्नेहाची आणि नववर्षांच्या स्वागताची गुढी उभारताना कोविड संकट निवारण्याचा संकल्प करून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या
रूग्णासमवेत पाडवा सण गोड केला. गुढी पाडव्याचे औचित्य साधून खा.सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथील कोविड रूग्णालयास भेट दिली.
कोरोनाच्या संकटला घालविण्यासाठी उपाय योजनांबरोबरच नियमांचे पालन आणि निर्बधांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प यानिमित्ताने सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी केला. शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे,
नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, वैद्यकीय अधिकारी मैथिली पितांबरे, डॉ.गोकुळ घोगरे, डॉ. संजय गायकवाड, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|