मनसेच्या अ‍ॅड.अनिता दिघे यांचा शिव राष्ट्र सेना पक्षात प्रवेश

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-  मनसेच्या अ‍ॅड.अनिता दिघे यांनी शिव राष्ट्र सेना पक्षात प्रवेश केला असून, त्यांच्यावर महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबदारी देण्यात आली. यावेळी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

तसेच दलित आघाडी शहर सचिवपदी रजनीकांत आढाव यांचीही नियुक्ती करण्यात आली. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, भिंगार मंडल अध्यक्ष राकेश सारवान, सौ.रत्ना नवसुपे, सौ.गायत्री कांबळे, सौ.वंदना भोखे, आश्विनी पाटील, सौ.संध्या जोशी आदि यावेळी उपस्थित होते.

यावेळी संतोष नवसुपे म्हणाले, जनहिताचे सर्व प्रश्न सरकार दरबारी व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करुन सोडविण्यासाठी व कायद्याचे ज्ञान असणार्‍या अ‍ॅड. अनिता दिघे यांचा पक्षात प्रवेश झाला आहे.

जुन्या पक्षात 14 वर्षे कार्य केल्याने त्यांचा संघर्षमय नेतृत्वामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, त्याच प्रमाणे शिव राष्ट्र पक्ष वाढीसाठी उपयोग होईल. तसेच रजनीकांत आढाव यांचेही पक्ष कार्यात महत्वपूर्ण योगदान राहील.

याप्रसंगी अनिता दिघे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून शिव राष्ट्र पक्षाने विविध निवेदने, आंदोलने, उपोषण आदि माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन मी शिव राष्ट्र सेना पक्षात प्रवेश केला आहे.

मी मनसेच्या स्थापनेपासून पक्षात होते. पक्षाच्या कार्यात सक्रीय सहभाग देऊन अनेक प्रश्न सोडविले, परंतु आता राजीनामा दिला आहे. आता शिव राष्ट्र पक्षात प्रवेश केला व जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.

त्या माध्यमातून मी पक्षाचे काम करणार असून, विशेषत: महिलांचे प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. त्याचप्रमाणे कायदेशीर सल्लागार म्हणूनही आपली भुमिक़ा राहील.

पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटन करुन जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही जिल्हाध्यक्ष म्हणून आपले प्राधान्य राहील, असे सांगितले. याप्रसंगी विनोद साळवे, अक्षय ससाणे,सुरज गायकवाड, अक्षय पाटकर आदि उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!