दीड दशकानंतर ‘तो’ यावर्षी ओकणार आग

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  मार्चच्या पहिल्या आठवड्यातच होणाऱ्या उकाड्याने उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव झाले आहे. यावर्षी सर्वाधिक उन्हाळा असे संकेत हवामान खात्याने दिले आहे.

मार्च ते मे महिन्यापर्यंत दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवेल, अशी माहिती हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा यांनी दिली आहे.

यापूर्वी पंधरा वर्षापूर्वी म्हणजे 2006 मध्ये फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले होते. महाराष्ट्रासह पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश बिहार, बंगाल, झारखंड येथे यावर्षी जास्त तापमान राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड आणि ओडिशामध्येही या वर्षी तापमान नेहमीपेक्षा वर जाईल. कोकण गोवा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल.

आनंद शर्मा म्हणाले, फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानही सामान्यपेक्षा खूपच जास्त होतं. 2006 नंतर पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये इतकी उष्णता जाणवत आहे.

ते म्हणाले, प्रशांत महासागरात हिवाळ्यात एल निनोचा प्रभाव जास्त असल्यामुळे हिवाळाही जास्त होता. परंतु आता त्याचा परिणाम कमी होताना दिसत आहे. यामुळे उष्णता वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe