अहमदनगर शहरातून मुलांसह बेपत्ता झालेल्या त्या महिलेचा पतीस संदेश म्हणाली…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-नवरा – बायको म्हंटले कि प्रेम- वादविवाद या गोष्टी घडताच असतात. साता जन्माची साथ देण्याचे वाचन देत पती पत्नी संसाराचा गाडा ओढत असतात.

मात्र नगर शहरातील एका घटनेमुळे तर खळबळच उडाली आहे. शहरातील सावेडीच्या प्रेमदान हाडकोमध्ये एक आई आपल्या चार मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी ळासाहेब गणपत पानसरे (वय ४५) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

बाळासाहेब पानसरे यांची पत्नी पल्लवी पानसरे (वय ३६), मुलगी वैष्णवी पानसरे (वय १८), वैभवी पानसरे (वय १८), सोनल पानसरे (वय १७) असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.

३ फेब्रुवारीला सकाळी बाळासाहेब यांचे पत्नी पल्लवी सोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यानंतर पल्लवी आपल्या चार मुलांना घेऊन शिक्रापूर (जि. पुणे) येथे बाळासाहेब यांच्या साडूची मुलगी प्रिती जाधव यांचेकडे गेली.

यानंतर बाळासाहेब यांचे साडू विजय भगत यांनी बाळासाहेब यांना फोन करून सांगितले की, पल्लवीने सोशल मीडियावर मी आत्महत्या करीत आहे,

असा मेसेज पाठवला आहे. यानंतर पत्नी पल्लवीसोबत संपर्क झाला नसल्याने बाळासाहेब यांनी पत्नी व मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान हि माहिती कळताच संबंधित महिलेचा पती बाळासाहेब पानसरे यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठले. व आपली पत्नी आपल्या चार मुलांसह बेपत्ता झाली असल्याची तक्रार दाखल केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe