अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- पती पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून बाळासाहेब गायकवाड यांना लोखंडी गज व काठीने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली आहे.
याबाबत चार जणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथील रहिवाशी असलेले बाळासाहेब भानुदास गायकवाड यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, बाळासाहेब गायकवाड व त्यांची पत्नी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता.
त्या वादावरून दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजे दरम्यान आरोपींनी बाळासाहेब गायकवाड यांना शिवीगाळ दमदाटी करत लोखंडी गज, काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.
घटनेनंतर बाळासाहेब गायकवाड यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. बाळासाहेब गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलीसांत आरोपी दादासाहेब मच्छिंद्र गागरे, शिवाजी मच्छिंद्र गागरे, संभाजी मच्छिंद्र गागरे,
सोनाली बाळासाहेब गायकवाड (रा. राहुरी) या चार जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक आजिनाथ पालवे हे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम