अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याला अखेर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद मध्ये अटक केली आहे.
बोठेसह आणखी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला अखेर जेरबंद करण्यास पोलिसांना शनिवारी यश आले.
बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा. बालिकाश्रम रोड, अहमदनगर), जर्नादन अकुला चंद्राप्पा (रा. सारोमानगर, रंगारेड्डी, हैदराबाद, तेलंगणा), पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ( रा. हैदराबाद, तेलंगणा) ( फरार), राजशेखर अंजय चाकाली ( रा. मुस्ताबाद, तेलंगणा),
शेख इस्माईल शेख अली ( रा. रंगारेड्डी, तेलंगणा), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (रा. रंगारेड्डी, तेलंगणा), महेश वसंतराव तनपुरे ( नवलेनगर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.
दरम्यान या अटके नंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अहमदनगर पोलिसांचे अभिनंदन करत एक ट्विट ही केले आहे.
यात ते म्हणाले आहे कि ” अहमदनगर गुन्हे शाखा पोलिसांनी आज हैदराबाद येथून यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी बोठेसह ६ जणांना जेरबंद केले आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन!
अहमदनगर गुन्हे शाखा पोलिसांनी आज हैदराबाद येथून यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी बोठेसह ६ जणांना जेरबंद केले आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन!@NagarPolice pic.twitter.com/vdT0QZU6yn
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 13, 2021
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|