अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ घटनेवरून तृतीयपंथीय झाले आक्रमक ! म्हणाले तृतीयपंथी समाजाला कलंक …

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- राहाता पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या खुन्ह्यातील आरोपी म्हणून तृतीयपंथीयांची नावे आली आहेत. पोलिसांनी शहानिशा न करता ते आरोपी तृतीयपंथीय म्हणून घोषित केले आहेत.

त्यामुळे तृतीयपंथी समाजाला कलंक लागला आहे व आम्हाल अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर केसची पूर्ण चौकशी करून आरोपींना पुरूष म्हणून घोषित करावे व ते तृतीयपंथीय असल्याचा शब्द केसमधून वगळण्यात यावा, अशी मागणी तृतीयपंथीय संघटनेच्या अध्यक्ष काजल गुरू यांनी केली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी लैला, रिठा, आयशा, रिमा, रंगिली, तनिषा, कम्मो, संध्या, सोनू, शंकराआई, मस्तानी, गौरी, निशा, धनश्री, तेजश्री, सना, साधना, निकिता, वर्षा, जोया आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले की, सदर प्रकरणातील चार आरोपी हे खोटे तृतीयपंथी धरले आहेत. त्यातील एका आरोपीला दोन मुले आहेत. व इतर 3 आरोपी हे श्रीरामपूर शहरातील चोरटे आहेत. हे चार आरोपी तृतीयपंथी आहेत, असे भासवून श्रीरामपूर शहरात चोर्‍या करतात.त्याच्यावर श्रीरामपूर शहरात गुन्हे दाखल आहेत.

या लोकांमुळे शहरातील व जिल्ह्यातील खर्‍या तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगळा झाला आहे. आम्हाला चांगल्या प्रतिष्ठीत लोकांनी फोन करून विचारणा केली की, तुम्ही हे काय काम केले? तुमचे हात आशिर्वाद देण्याकरीता असतात. त्यामुळे आम्हाला लोकांनी दानधर्म देणे सुध्दा बंद केले आहे,

लग्न समारंभ व इतर कार्यक्रमातून आम्हाला हाकलून दिले जात आहे. पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता, त्यांची मेडिकल न करता त्यांना तृतीयपंथी म्हणून घोषित केले आहे.

त्यामुळे आमच्या समाजाला कलंक लागलेला आहे. सदर केसमधून तृतीयपंथी शब्द काढण्यात यावा व आम्हाला न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe