अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- अज्ञात आजाराने गुरुवारी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे आणखी चार जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून आतापर्यंत 7 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अज्ञात आजाराने जनावरे घडवली जात आहे. यातच रांजणगाव देशमुख येथील कैलास मुरलीधर गोर्डे या शेतकर्याच्या चार,
दशरथ साहेबराव खालकर यांची एक, संपत लक्ष्मण खालकर यांची एक तर अनिल रघुनाथ खालकर यांचा एक बैल अशी सात जनावरे आतापर्यंत दगावली आहेत. तर अजून चार जनावरे अत्यवस्थ आहेत.
आजारी गायी विषबाधा सदृश लक्षणे दाखवत आहेत .ही जनावरे उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. दरम्यान सोमवारी मृत जनावरांचे शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते
त्याचा अहवाल आला असून त्यात ऑक्झीलेट विषबाधा असल्याची माहिती कोपरगावचे सहाय्यक आयुक्त डॉ.अजयनाथ थोरे यांनी दिली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|