आक्रमक ग्रामस्थांनी दारू विक्री पाडली बंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील खोसपुरी येथे खानावळीच्या नावाखाली गावच्या परिसरात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री दुकानांविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ही दुकाने बंद पाडली.

पुन्हा दुकाने सुरु झाल्यास ग्रामस्थ थेट कायदा हातात घेवून ही दुकाने जेसीबी लावून पाडली जातील. असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,

नगर तालुक्यातील सारोळा कासार-घोसपुरी रस्त्यावर घोसपुरी गावाच्या शिवारात खानावळीच्या नावाखाली अवैध दारूविक्रीची दोन दुकाने थाटलेली आहेत.

तेथे खुलेआम मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्याने गावातील सामाजिक शांतता भंग पावत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट दारू दुकानांमध्ये जात दुकानचालकांना ही दुकाने तातडीने बंद करण्यास सांगितले.

दुकाने सुरु ठेवली तर गावातील महिला व ग्रामस्थ आक्रमक होऊन कायदा हातात घेतील, असा इशाराही दिला. दरम्यान दारूविक्री बाबत आक्रमक ग्रामस्थानी नगरला येवून जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षकांना ग्रामस्थांनी निवेदने दिली आहेत.

मौजे घोसपुरी शिवारात अवैध्यरीत्या दारू विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे ३-४ ठिकाणी चालू आहेत. सदर व्यवसायासंदर्भात यापूर्वीही पोलीस अधिक्षक कार्यालय व नगर तालुका पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले होते.

तरीही हा व्यवसाय अद्यापपर्यंत बंद झालेला नाही. उलट या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे गावामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत.

दरम्यान अवैध दारू धंदे त्वरित बंद करण्यात यावेत यासाठी २००-३०० लोक एकत्र येऊन सदर व्यावसायिकांना समज दिली आहे.

त्यानंतरही हे अवैध धंदे चालूच राहिले तर ग्रामस्थ थेट कायदा हातात घेवून ही दुकाने जेसीबी लावून पाडली जातील असा इशाराही घोसपुरी ग्रामस्थांनी दिला आहे.

यावेळी सरपंच किरण साळवे, उपसरपंच विठ्ठल हंडोरे, माजी उपसरपंच प्रभाकर घोडके, प्रा. अशोक झरेकर, राजेंद्र लांडगे, बाळासाहेब झरेकर, श्याम शेख, संजय खोबरे, बापू झरेकर, अनिल हंडोरे, किसन पारधे, बबन झरेकर,

सुभाष ठोकळ, सोमनाथ झरेकर, पद्माकर झरेकर, संजय झरेकर, सारोळा कासारचे माजी उपसरपंच दत्तात्रय कडूस, सोसायटीचे संचालक दत्ता लिंभोरे यांच्यासह दोन्ही गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!