अहमदनगर ब्रेकिंग : मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या रागातून मित्राचा खून ! बिबट्याने हल्ला केल्याच खोटं आणि तपासात सगळच आलं बाहेर…

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर तालुक्‍यातील पठार भागातील कुरकुटवाडी येथील तरुणाचा मृत्यू बिबट्याने केलेल्या हल्ल्यात झाला नसून मैत्रिणीला फ्रेंड रिक्केप्ट पाठवल्या रागातून मित्राने कोयत्याने गळ्ल्यावर वार केल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भानुदास कुरकुटे (वय २२, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) या युवकाचा (दि.२७) ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता.

बिबट्याने हल्ला केल्याने या तरुणाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात आला होता. मात्र पोलीस तपासात त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. कुरकुटवाडी गावामध्ये आपल्या घराच्या ओट्यावर झोपलेल्या सचिन कुरकुटे व त्याचा भाऊ झोपले होते.

रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सचिन याच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात सचिन याच्या मानेवर खोलवर जखम झाली होती. त्याच्या भावाने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते.

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे सचिन याला उपचारासाठी तातडीने जवळच्या आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा झाली होती.

याबाबत गोकुळ जिजाबा कुरकुटे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर याबाबतची कागदपत्रे घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.

घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे या मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये सचिन कुरकुटे यांच्या मानेवरील जखम हत्याराने झाली असल्याचे म्हटले होते.

यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला होता. मृत सचिन कुरकुटे याचे आर्थिक व्यवहार तसेच घरगुती व बाहेरील लोकांसोबत असलेले वाद, प्रेम संबंध यासह अन्य शक्‍यता लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.

तपासा दरम्यान पोलिसांनी जवळपास अनेकांचे जबाब नोंदविले. मृत सचिन कुरकुटे यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्वेषणाचा अभ्यास केल्यानंतर त्याने एका मैत्रिणीस समाज माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असल्याचे लक्षात आले. मैत्रिणीला फ्रेंड रिक्ेप्ट पाठविली, या कारणामुळे सचिन कुरकुटे व गणेश बबन कुरकुटे यांच्यात वाद देखील झाले होते.

ही बाब समोर आल्यानंतर केलेल्या तपासात गणेश कुरकुटे याने रागातून सचिन कुरकुटे याची झोपेत असताना गळ्यावर कोयत्याने वार करून हत्या केली असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपी गणेश बबन कुरकुटे (वय २१) याला पोलिसांनी अटक केली. त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe