अहमदनगर ब्रेकींग: चार वाहनांचा भीषण अपघात; दोन ठार, 15 जखमी

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar Breaking :- ट्रक, क्रुझर, रिक्षा आणि दुचाकी या चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे ठार झाले असून सुमारे 15 प्रवासी जखमी झाले आहेत.

अहमदनगर- सोलापूर महामार्गावरील कोकणगाव (ता. कर्जत) शिवारात रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये कोकणगाव येथील एकाचा व क्रुझर मधील एकाचा समावेश आहे.

मृत व जखमींची नावे समजू शकली नाही. दरम्यान जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. आठ जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर सात जणांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर अपघातांमध्ये मालवाहतूक ट्रक हा सोलापूरकडून अहमदनगरकडे येत होता. तर इतर तीन वाहने ही मिरजगावच्या दिशेने सोलापूरकडे जात असताना हा अपघात झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe