अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निंबे येथे ११ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबतची माहिती अशी, पाटोदा तालुक्यातील ऊस तोडणी कामगार निंबे येथे वास्तव्यास आहे. धुणे धुण्यासाठी भवानी माता तलावावर गेलेल्या आईसोबत हा मुलगा होता.

मात्र आईची नजर चुकवून हा मुलगा बाजूला गेला आणि तलावात बुडाला. काही वेळानंतर या दुर्घटनेची माहिती मिळाली.
ऊस तोडणी कामगाराचा हा मुलगा होता. साजन सावंत असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम