अहमदनगर ब्रेकिंग ! लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय महिलेवर अत्याचार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय महिलेवर एका जणाने पाच वर्षे अत्याचार केला. यातून सदर महिला गर्भवती रहिली असल्याचे समजताच आरोपी इसमाने पलायन करत महिलेची फसवणूक केली.

दरम्यान सदर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून अत्याचार करणार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील राजापूर परिसरातील महिला व खेड तालुक्यातील नागेश गुलाब कराळे यांची ओळख झाली.

नंतर दोघांचे प्रेमसबंध जुळल्याने त्याने लग्नाचे आमिष दाखवून या महिलेवर राजापूर येथे पाच वर्षे शरीर संबंध ठेवले.

सदर महिला गरोदर असल्याचे समजल्यानंतर कराळे याने पलायन केले. महिला व तिच्या आईने लोकांकडून घेऊन दिलेले पैसे त्याने परत दिले नाही.

या महिलेची जुपिटर गाडी व दोन वर्षांपूर्वी राजापूर गावात खरेदी केलेल्या मालमत्ताचे खरेदीखत व आधारकार्ड, पॅनकार्ड घेऊन तो पळून गेला.

याबाबत अत्याचारित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नागेश गुलाब कराळे, (रा.चांडोली फाटा, जि.पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!