अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे ५९ वर्षीय पुरुष व्यक्तीने चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे.
टाकळीमिया येथील रहिवासी असणारे कचरू रामचंद्र निमसे(वय-५९) हे शनिवार पासून राहत्या घरातून बेपत्ता होते.
त्यांच्या मुलगा सर्वत्र शोध घेत असताना आज रविवारी सकाळी शेतकी ऑफिसच्या पाठीमागे असलेल्या ओढ्या जवळील चिंचेच्या झाडाला कचरू निमसे यांचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
त्यानंतर स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली. निमसे यांचा मृतदेह खाली उतरविल्यानंतर साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेद्वारे राहुरी येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मयत कचरू निमसे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम