अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा मृतदेह महापालिकेच्या जवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये सापडला होता.
या युवकाचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता. विकास चव्हाण असं मयत तरुणाचे नाव होते. या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
विकास चव्हाण या तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी रिक्षा मिळत नसल्याने त्याने आरोपीला लिफ्ट मागितली.
मात्र त्या दुचाकीस्वाराने स्मशानभूमीत नेत त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी आरोपी शाहरुख फिरोज खान यास सिटीचौक पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|